वकिलांवर हल्ला केल्यास पाच ते दहा वर्षे शिक्षा
राज्यात वकिलांवर हल्ला केल्यास कमाल पाच वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड आणि दुसऱ्यांदा असा गुन्हा करणाऱ्यासाठी ही शिक्षा दहा वर्षे करण्याची तरतूद महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मसुद्यात आहे. याबाबत राज्यभरातील बार असोसिएशनकडे सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. डॉक्टरांप्रमाणे वकिलांनाही सुरक्षा मिळावो व त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून केली जात होती. महाराष्ट्र बार काउंसिलने या कायद्याबाबतचा मसुदा प्रकाशित केला आहे.
यामसुद्यात वकिलांवर होणारे हल्ले, तपास अधिकाऱ्यांची भूमिका, वकिलांच्या संपत्तीचे रक्षण याबाबत काही तरतुदी केल्या आहेत. मसुद्यानुसार, वकिलांवर हल्ला झाल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. पहिल्यांदा हल्ला केल्यास किमान सहा महिने ते पाच वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंड तर दुसऱ्यांदा हल्ला केल्यास किमान एक वर्ष ते कमाल दहा वर्षे शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड अशोतरतूद असेल. वकिलांच्या संपत्तीचे नुकसान केल्यावर आरोपींकडून संबंधित संपत्तीच्या बाजारमूल्याच्या दुप्पट रकमेची वसुली केली जाईल. धमकी मिळालेल्या वकिलांना पोलीस सुरक्षा पुरवण्याची सूचना देखील वामध्ये आहे. वकिलांना मिळालेली पोलीस सुरक्षा हटवण्यासाठी पोलिसांना जिल्हा न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या निबंधकाची परवानगी गरजेची असेल. बार काऊंसिलचा हा मसुदा राज्य बार असोसिएशनकडे पाठवला आहे. राजस्थानमध्ये वकिलांच्या सुरक्षेचा कायदा पारित झाला असून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये अशाप्रकारचे कायदे करण्याची तयारी सुरू आहे.
मोठी बातमी ! पुन्हा एकदा पुण्यामध्ये मेफे ड्रॉन पप्रकारचा ड्रग्स साठा सापडला