मोफत 5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार : ‘आयुष्यमान भारत योजना’, कसा करणार ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या-सर्व काही

 

या योजनेचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला आहे. ही योजना केंद्र सरकार चालवते आणि आता अनेक राज्य सरकारेह तिच्याशी संलग्न आहेत. ही आरोग्य योजना असून त्याद्वारे गरजू व गरीब वर्गाला लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो.

आयुष्मान भारत योजना असे या योजनेचे पूर्ण नाव आहे.

‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ (Ayushman Bharat Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे ? एका क्लिकवर जाणून घ्या

  • जे निराधार किंवा आदिवासी आहेत, जे लोक भूमिहीन आहेत, ज्या लोकांची घरे कच्ची आहेत. जे रोजंदारी मजूर आहेत ग्रामीण भागात राहणारे लोक. ज्यांच्या कुटुंबात दिव्यांग सदस्य इ. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.किंवा, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

 

ऑनलाईन अर्ज खालील प्रमाणे आपण स्वत करू शकतो

  • सर्वात आधी pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
  • मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number नंबर टाका.
  • जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
  • तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.

 

Leave a Comment